spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संघर्षशील व्यक्तिमत्व क्रांतीजोती सावित्रीबाई फुले – दिलीप येवले

खापा :- स्थानिक मोहपा दि. २२जानेवारी रोजी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने बॅरि. शेषराव वानखडे महाविद्यालय मोहपा, येथे महात्मा फुले आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.

निबंध स्पर्धेचा पुरस्कार वितरणाचा सोहळा दि. २२ जानेवारी गुरुवारला दैनिक जनप्रभात, नागपूरचे उपसंपादक दिलीप येवले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षशील जीवन प्रवासावर आपल्या ओझळत्या वाणीतून विद्यार्थ्यासमोर उभा केला आणि शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हा आत्मविश्वास दिलीप येवले यांनी प्रमुख वक्ता म्हणून विद्यार्थीशी संवाद साधला.

या स्पर्धेमध्ये २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रथम पुरस्काराचा मानकरी बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी आदित्य पेंदाम प्रथम पुरस्कार तर द्वितीय पुरस्काराची मानकरी एम. ए. समाजशास्त्र द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अर्चना नेहारे, यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि एक पेन देण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले प्रा. डॉ. प्रमोद वडते, डॉ. धनंजय देवते, डॉ. संजय ठवळे, प्रा. सचिन काळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. शुभम वाघ, कल्पना देवळे, हरीश अंजनकर, रजनी अकर्ते, प्रदीप बगडे, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विनोद भालेराव यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. लिलाधर खरपुरीये यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. अनिता गणोरकर यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.