Home Latest News संघर्ष नायक नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस म्हणून...

संघर्ष नायक नारायण बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती ऐक्य संदेश दिवस म्हणून साजरा करणार

0
36

कोणकोणत्या समुदायाला जातीचे चटके सहन करावे लागले त्यांच्या शोध घेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एका माळेत गुंतले व ती माळ आपल्या सर्वांच्या गळ्यात यासाठी दिली की तुम्ही सर्व एकाच व्यवस्थेचे बळी होते. हि माळ एकसंध राहिली पाहिजे परंतु आज उपवर्गिकरणाचा नावाने हि माळ तोडण्यासाठी काहि हात सरसावले आहे. याला लगेच लगाम घालण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे च्या २५ मे २०२६ रोजी, वाढदिवसाच्या निमित्ताने अनुसूचित जाती समन्वय अभियान राबविण्यात येणार आहे. प्रस्तुत अभियान अंतर्गत अनुसूचित जाती मधिल विविध घटकांना उपवर्गिकरणाचा धोका पटवून सांगण्यात येणार आहे अभियानाच्या पहिल्या टप्प्या साहित्य भुषण अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव जिल्हा सांगली दुसऱ्या टप्प्या अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चेंडी जिल्हा अहिल्याबाई होळकर, तिसऱ्या टप्प्या पोचिराम कांबळे जन्मगाव टैर्भुनी जिल्हा नांदेड चौथ्या टप्प्यात प्रथम अस्पृश्य परिषदेने गाजलेले गाव सुकळी मानगाव जिल्हा कोल्हापूर होणार आहे असे प्रदेश जनसंपर्क प्रमुख डॉ.श्रीकुष्ण बेडसे यांनी माध्यमांना कळविले आहे.