यवतमाळ :- सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत महसूल विभागाच्या सर्व सेवा पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्यानिमित्त विविध तालुक्यात कार्यक्रम आज झाले.कोळंबी येथे मीना, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला. उपविभागीय अधिकारी गोपाळराव देशपांडे, तहसीलदार योगेश देशमुख उपस्थित होते. पात्र व्यक्तींना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवास दाखले, गोल्डन कार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे वितरीत करण्यात आली. कोळंबी गावातील 31 पात्र घरकुल लाभार्थी व वरुड गावातील वीस पात्र घरकुल लाभार्थी यांना शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करून घरकुलासाठी जमिनीचे पट्टे प्रदान करण्यात आले.

आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथे शेतकरी जयस्वाल यांच्या रोजगार हमी योजना अंतर्गत फळबागेला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रकाश बुटले यांच्या सेंद्रिय खत प्रकल्पास भेट दिली.
पांढूर्णा येथील लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सेवा पंधरवडा टप्पा दोन अंतर्गत प्लॉट पट्टेवाटप झाले तसेच त्यांनी मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत संवाद साधला. अतिक्रमित शेत रस्ता भेट शिवार फेरी सीमांकन व पाहणीही त्यांनी केली.
दारव्हा तालुक्यातील कुऱ्हाड येथेही शिवार फेरी व पांदन रस्त्याचे कडेला वृक्षारोपण झाले. मिशन उभारीअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी चर्चा व साहित्य वितरण, तसेच शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात वाटप झाले.

गावातील नागरीकांना फवारणी कीटचे वाटप करण्यात आले तसेच आयुषमान कार्ड, रेशन कार्ड व मिशन उभारी अंतर्गत शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील शेतकरी श्रीमती रुपाली अंकुश राठोड व शालु मानिक राठोड यांना सिंचन विहीरीचा लाभ देण्यात आला कु-हाडचे सरपंच अनिल अवटी उप सरपंच अमोल कालापाड धामनगांव देवचे सरपंच जगदिश जाधव कोहळाचे सरपंच उमेश चव्हाण व कुणाल जाधव सामाजिक कार्यकर्ते तसेच गावक-यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, रवि काळे, तहसिलदार राजीव शिंदे गट विकास अधिकारी, गणेश गीरी कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.




