spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खोडगाव येथे रंगणार दुय्यम खडा तमाशा

– राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- दीपावलीच्या शुभपर्वावर तालुक्यातील खोडगाव येथे मंगळवारी (दि.२८) ऑक्टोंबरला नवयुवक मंडई उत्सव मंडळ खोडगाव तथा छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळ खोडगावतर्फे दुय्यम खडा तमाशा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खोडगाव येथील दुय्यम खडा तमाशाचा कार्यक्रम सर्वदुर प्रसिद्ध असून लगतच्या गावांमधुन शेकडो नागरीक या कार्यक्रमाच्या वेळी येथे आवर्जुन उपस्थित राहून आनंद घेतात. सकाळी ९ वाजता दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

कुही तालुक्यातील पारडी येथिल कोहिनुर बहुउद्देशिय सांस्कृतिक लोककला निकेतन शाहीर निशान सुखदेवे व भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कान्हळगाव येथील गुरु सुभान पार्टी शाखा कान्हळगाव येथील शाहीर शामबाबु खोब्रागडे यांच्यात जंगी मुकाबला रंगणार असल्याची माहिती माजी सरपंच तथा शाहीर शिशुपाल अतकरे यांनी दिली. राज्यमंत्री आशिष जयस्वाल कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन तर, प्रमुख पाहुणे म्हणुन माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, भाजपा नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जु यादव, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ कामठी शाहिर राजेंद्र बावनकुळे, सरपंच सविता सुभाष नागोसे, पोलीस पाटील धनराज ठाकरे, माजी सरपंच शिशुपाल अतकरे, माजी ग्रा.पं. सदस्य भिमराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थीत राहाणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नवयुवक मंडई उत्सव मंडळ खोडगाव तथा छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळ खोडगावतर्फे करण्यात आलेले आहे.

Popular Articles