spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान येथे ज्येष्ठ नागरिक दिवस उत्साहात साजरा ; विविध क्षेत्रातील ज्येष्ठांचा सत्कार

– कन्हान, कांद्री शहर विकास मंच व्दारे सत्कार सोहळ्याचे आयोजन

कन्हान :- ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कन्हान, कांद्री शहर विकास मंच व्दारे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील नागरिकांची बहु संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंच मार्गदर्शक भरत सावळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी मुख्याध्या पिका विशाखा ठमके, लीला देशमुख, ज्येष्ठ पत्रकार तथा माजी मुख्याध्यापक एन. एस. मालविये, ज्येष्ठ समाजसेवक शांतराम जळते, प्रकाश नाईक, श्रीराम नांदुरकर, माजी सैनिक जयवंत गटपाडे, रविकुमार रंग, अरविंद अंबास्कर, मोहनसिंग यादव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंच पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दुपट्टा, शाल, पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद करत ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा समाजाच्या विकासासाठी उपयोग होणे आवश्यक असल्याचे संबोधित केले. सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्तावि कातुन मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी कन्हान शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा उपस्थित करत शहरातील मूलभुत सुविधांच्या प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केली. शहरातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधत नागरिकांनी एकत्रितपणे पुढे येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी संबोधिले. सूत्रसंचालन मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी तर आभार ज्ञानेश्वर उके यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, नयन गायकवाड , अर्जुन पात्रे, ज्ञानेश्वर उके, सूर्यभान चकोले, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे, शुभम बावनकर, मयूर बावने , प्रमोद गिऱ्हे, अर्चना तांडेकर, सुषमा मस्के, मीना गिऱ्हे, मेघा कोल्हे, रंजना किरपाने, सुनीता मानकर, राहुल वानखेडे, सुरज वरखडे, आयुष संतापे यांच्यासह मंच पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles