किशोर साहू, मौदा :- ग्राम पंचायत नांदगाव तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील मुलांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच दिपक पडोळे, उपसरपंच सुनीता थोटे , ग्रामपंचायत सदस्यगण कैलास महादुले ,बेनिराम पडोळे, उषा आष्टणकर, योगिता खोब्रागडे, सचिव निशांत हिंगाणे उपस्थित होते.
ग्रामपंचायत ने स्कूल बॅग चे वाटप केल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांसह, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी ग्रामपंचायतचे आभार मानले आहे.





