तिरोडा :- परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत तिरोडा तालुक्यातील सेवकांचे संमेलन वडेगाव येथे 18 रविवार रोजी आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने सातोना सागवानवाडीच्या मैदानावर विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी सकाळी 7 वा. मंगल रहांगडाले यांच्या निवासस्थानी सामूहिक हवन कार्य होणार आहे. 9 वा. शोभायात्रा, दु. 12 वा. संमेलनाचे उद्घाटन व स्वागत समारंभ, दु. 1 वा. भगवत कार्याची चर्चा, सायं. 5 वा. भोजन व प्रसाद वितरण, सायं. 7 वा. मातोश्री कलामंच प्रस्तुत अमर दिघोरे यांचा ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागपूर मंडळाचे उपाध्यक्ष देवराम तुमसरे, उद्घाटक सचिव किरण राऊत, आयोजक प्रदीपकुमार चौधरी व मंगल रहांगडाले असणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, खा. प्रशांत पडोळे, आ. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले, रवींद्र गायधने यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष डॉ. माणिकराम बिसेन, उपाध्यक्ष राजेश आकरे, सचिव हिवराज रहांगडाले, पद्माकर बिसेन, नेकराम सोनेवाने यांनी केले आहे.








