spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’

– महापौर निता ठाकरे यांनी दाखविली माणुसकी

– रस्ते अपघातातील जखमी महिलेच्या मदतीला धावले

नागपूर :- “जन सेवा ही परम सेवा” या ब्रीदवाक्याची प्रचीती आज नागपूरकरांना अनुभवायला मिळाली, नाईक तलाव परिसराची पाहणी करून मनपा मुख्यालयाच्या दिशेने येत असताना, शहराच्या प्रथम नागरिक महापौर  निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी तत्परता दाखवत एका अपघातग्रस्त महिलेचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला.

नाईक तलाव परिसराचे निरीक्षण आटोपून महापौरांचा ताफा सिव्हिल लाईन येथील मनपा मुख्यालयाकडे मार्गस्थ होत होता. दरम्यान, विभा पुंडलिक बांगरे (वय ५५ वर्ष) यांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचा इजा झाली असल्याचे पाहताच, महापौर निता ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला.

कोणत्याही प्रोटोकॉलची वाट न पाहता महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी स्वतः गाडीतून उतरून जखमीची विचारपूस केली. महापौर निता ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन विभा पुंडलिक बांगरे यांना आधार दिला आणि तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

केवळ मदत करून न थांबता, जखमी विभा पुंडलिक बांगरे यांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत याची खातरजमा महापौर निता ठाकरे यांनी केली. लगेच मनपाच्या रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी  विभा पुंडलिक बांगरे यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापौरांच्या या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ‘पद आणि प्रतिष्ठा’ बाजूला ठेवून त्यांनी दाखविलेली ही माणुसकी खऱ्या अर्थाने जनसेवेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

“लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. अपघात घडल्यानंतर तातडीने मदत मिळणे हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. आज त्या भगिनीला वेळेत मदत करता आली, याचे मला मोठे समाधान आहे.

निता ठाकरे,महापौर, मनपा नागपूर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.