spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शतकवीर रा. स्व. संघ” पुस्तकाचे उद्या प्रकाशन

नागपूर :- “RSS@100 शतकवीर रा.स्व.संघ” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. हेडगेवार पुण्यतिथी आणि योग दिनाच्या मुहूर्तावर रविवार, 21 जून रोजी 2026 सायंकाळी 6 वाजता होत आहे.

ज्येष्ठ पत्रकार, विदर्भ विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा महाराज बागेजवळील प्रेस क्लब सभागृहात होईल.

संघशताब्दीनिमित्त विनोद देशमुख, प्रदीपकुमार मैत्र आणि कल्याणकुमार सिन्हा या तीन ज्येष्ठ पत्रकारांनी लिहिलेले हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्लिश असे त्रिभाषिक आहे.

Popular Articles