spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिंदे गट शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष सुरज गोजे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

– पत्रकार परिषदेमध्ये घनश्याम चापरे यांची धाव 

नागपूर :- घनश्याम चापरे यांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप ! बेकायदेशीर रित्या सोने गहाण ठेवून व्याजाने पैसे देणे व परतफेड केल्यानंतर ही सोने न परत केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी सुरज गोजे यांनी दिली. 17 ऑगस्ट 2020 रोजी 11 तोळे सोने गहाण ठेवले होते. गोजे यांचे व्याजासह पैसे वापस दिले. परंतु सोन देण्यास नकार देऊन धमकी दिली.

अकरा तोळे सोनं परत करण्यास नकार ! उलट धमकी देत कसलं सोनं विसरून जा ! निघा इथून ? असे शब्दात सुरज गोजे यांनी घनश्याम चापरे यांना उत्तर दिले. हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात गेले असता गुन्हा दाखल करण्याची टाळाटाळ केली आहे परंतु त्यांचे सोनं परत मिळाले नाही. यासाठी पत्रकार परिषदेमध्ये धाव घेतली जर माझे सोन परत नाही मिळाले तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन आणि याला जबाबदार सुरज गोजे राहील. असे पत्रकारांना सांगून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.