नागपूर :- दक्षिण नागपूरतील अमर नगर कडे जाणाऱ्या रोडवरील महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरी महाकाली नगर चौकात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा माँ जिजाऊ डेअरी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव गुरुवारला दुपारी 12 वाजता. साजरा करण्यात येतो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे सातवे वर्ष आहे. माँ जिजाऊ डेअरीचे संस्थापक किशोर पवार आणि आयोजक शाहू पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.




