spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाकाली नगर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर :- माँ जिजाऊ प्रतिष्ठान किशोर पवार महाकाली नगर चौक यांच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात महाकालीनगर चौकात पार पडला. राजे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सर्वप्रथम नवनिर्वाचित नगरसेवक बाबाराव तायडे तसेच मॉ जिजाऊ डेअरीचे संस्थापक किशोर पवार यांच्या नेतृत्वात माल्यार्पण व आरती करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दक्षिणचे आमदार मोहन मते यांच्या अध्यक्षतेत पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर हिंदू एकता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष स्वप्निल साळुंके व सुनील मानेकर यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्याचे आयोजन शाहू पवार यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवकालीन युद्ध कलेचा प्रदर्शन तलवार, दानपट्टा, लट आणि भाला याचे मोरेश्वर भाऊ व विकास हिंगे यांच्या मार्गदर्शनात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याप्रसंगी वस्तीतील सर्व नागरिकगंण, महिला मंडळी, युवक आणि युवती मंडळी सर्व गणमान्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात चिमुकली सानवी टिक्कस झांशीची राणी या वेशभूषेत होती. हे विशेष: कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर सपकाळ, शाहू पवार, भूषण टिक्कस, सही पवार, दीपक लाडसे, गजू जाधव, अनुराग धारपुरे, मनीष काटोले, गजानन गायकवाड, नितेश वानखेडे, आकाश काळे, सचिन शिंदे, दिनकर गोतमारे, धनराज काटकर, अतुल माने, प्रदीप गणोरकर, किशोर बुराडे, अजय रामगीरकर आणि देवरावजी प्रधान यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन दीपक खेडकर यांनी तर आभार चंदा पवार यांनी मानले. सर्व पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार किशोर पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.