spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोरवाल महाविद्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा

कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल कॉलेजच्या इतिहास विभाग व विशेष दिवस कार्यक्रम समितीच्या संयुक्त विद्यमाने ३५२ वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. विशेष दिवस कार्यक्रम समितीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नैतिकता व सत्यता या तत्वाच्या पायावर उभे असल्याने ते सुराज्य होते असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रम अध्यक्ष प्रा. डॉ. स्वप्नील दाहात यांनी राज्यकारभारच्या कारभारसाठी राज्याभिषेकाची आवश्यकता होती. त्यावर शिक्कामोर्तब करून शिवशाही सुरू झाली. ती आजही छत्रपतींच्या विचारांच्या माध्यमातून बहरत आहे, असे सांगितले. उपप्रचार्य डॉ. रेणु तिवारी यांनी छत्रपतींच्या महिला विषयक धोरणावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रा. डॉ. ईफ्तेखार हुसेन, डॉ. जयंत रामटेके, डॉ. विनोद शेंडे, प्रा. मोहम्मद असरार, डॉ. किशोर ढोले, डॉ. विकास कामडी आणि रजिस्ट्रार स्वप्नील राठोड, नीलेश रंगारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जोगी तर आभार डॉ. आशा रामटेके यांनी मानले.

Popular Articles