spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सीए फायनल परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण, श्रध्दा नितीन जाजू यांचे उल्लेखनीय यश

यवतमाळ :- यवतमाळ येथील कु. श्रध्दा नितीन जाजू यांनी प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट ( CA ) फायनल परीक्षा प्रथम प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण होत 383 गुण प्रात केले आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जाजू परिवारासह परिसरात आनंदांचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या यशाचे श्रेय देताना श्रध्दा यांनी सांगितले की, “सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम यांमुळे हे यश मिळवणे शक्य झाले.

कठीण प्रसंगी कुटुंबीयांनी दिलेला मानसिक आधार, प्रोत्साहन आणि विश्वास ही माझी सर्वात मोठी ताकद ठरली.”

श्रध्दा यांनी आपल्या आजोबा श्री. मेघराज जाजू यांना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानले. त्यांचे मार्गदर्शन, मूल्यसंस्कार आणि सततचा विश्वास यामुळेच आज हे यश शक्य झाले, असे त्या अभिमानाने सांगतात.

श्रध्दा यांनी वडील नितीन जाजू, आई योगिता जाजू तसेच संपूर्ण जाजू परिवाराचे विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे, पाठिंब्यामुळे आणि प्रेरणेमुळेच हे स्वप्न साकार करता आले, असे त्यांनी नमूद केले.

चार्टर्ड अकाउंटंट ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची व्यावसायिक परीक्षा मानली जाते. प्रथम प्रयत्नात मिळवलेल्या या यशाबद्दल श्रध्दा यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

श्रध्दा यांचे हे यश इतर विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरणारे असून कठोर परिश्रम, चिकाटी आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी सिंब्द करून दाखवले आहे.

Popular Articles