spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री गजानन महाराजांची नागपूर-कोराडी पायदळ दिंडी यात्रा रविवारी संपन्न

नागपूर :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराज यांची पायी दिंडी यात्रा रविवारी २६ ऑक्टोबर रोजी श्री संत गजानन महाराज मंदीर, निर्मल नगरी, उमरेड रोड, नागपूर येथून सकाळी ६ वाजता निघून श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर कोराडी येथे १ वाजेपर्यंत पोहचली. दिंडी यात्रेत सहभागी होणारे १००० माऊली भक्तगण आई, वडील, बंधु, भगिनी, छोटे बाल गोपाल, माय माऊली, मंदिरातील सर्व सेवेकरी माऊली या सर्वांच्या सहकार्याने व अथक परिश्रमाने हा दिंडी सोहळा मोठया संख्येने सहभागी होऊन थाटात पार पडला. हा नयनरम्य पालखी सोहळा पाहण्याचा आनंद भक्तांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिरात निर्मल नगरी मंदिर ट्रस्टकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी २ वाजता महाप्रसाद सुरू झाला आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिंडीत सहभागी होणाऱ्या १००० भक्त व दिंडी सोहळा पाहण्यासाठी परस्पर येणारे भक्तगण असे एकूण ३००० माय-माऊली भक्तांनी ज्योती हॉल येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. दिंडी यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व श्री भक्तांचे मंदिर ट्रस्टकडून खूप खूप आभार श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट निर्मल नगरी, उमरेड रोड, नागपूर चे सचिव सुनिल बालपांडे यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.