spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘श्री संत संताजी आर्ट गॅलरी’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

– संत जगनाडे महाराजांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

नागपूर :- मानवता आणि लोककल्याणाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील श्री संत संताजी जगनाडे चौकात स्थित ‘श्री संत संताजी आर्ट गॅलरी’चे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिसरातील संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, नासुप्रचे सभापती संजय मीना, एमएसएसआयडीसीचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे, माजी आमदार टेकचंद सावरकर, संत संताजी स्मारक समितीचे डॉ. यशवंत खोब्रागडे, डॉ. कैलास गायधने, डॉ. गुंजन देशमुख, डॉ. वाघमारे, विजय येरणे, डॉ. खंडाईत, उमेश शाहू, यांच्यासह माजी नगरसेवक नरेंद्र(बाल्या) बोरकर, माजी नगरसेविका चेतना टांक, मनीषा धावडे, माजी नगरसेवक तानाजी वनवे, दीपक वाडीभस्मे, हरीश दिकोंडवार, नासुप्रचे  प्रशांत भांडारकर मनपाचे सहायक आयुक्त विकास रायबोले,  शुभम घाटे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘श्री संत संताजी आर्ट गॅलरी’ येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रांची पाहणी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.