spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सिहोरा पोलिसांचा अवैध रेती वाहतुकीवर दणका; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा दि. ११ :– अवैध रेती वाहतुकीविरुद्ध मोहीम राबवत सिहोरा पोलिसांनी सिलेगाव-सिहोरा मार्गावर ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा एक स्वराज ट्रॅक्टर आणि ट्रॉली पकडली. या कारवाईत १ ब्रास रेतीसह ट्रॅक्टर असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी चालक रंजीत बाबुराव घटारे (४०, रा. सिलेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. सिहोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०६ (ई), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८ (८) आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७, ९ व ३(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ईळपाते व पथकाने केली.

Popular Articles