कन्हान :- येथील तिवाडे लेआउट पांधन रोड स्थित श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करण्यात येत आहे.
तिवाड़े ले-आउट स्थित गजानन महाराज मंदिर हे धार्मिक स्थल नाही तर उलट कन्हान च्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख बनत आहे. शनिवार (दि.७) फेब्रुवारी ला सायंकाळी शाम ६ वाजता सप्त खंजरीवादक बाल कीर्तनकार आणि ग्रामगीता प्रचारक वेदांती मुळेकर, श्री गुरुदेव सेवा मंडल यांचा ‘भक्त प्रबोधनात्मक’ कीर्तन होईल. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार यांचा सत्कार करण्यात येईल. रविवार (दि.८) ला सकाळी ९ वाजता ‘श्री’ ला रूद्राभिषेक, अभिषेक, कलश पुजन सकाळी १० वाजता अरूणोदय भजन मंडळाचे भजन, गोपाळ काला, महाआरती आणि सायंकाळी ६ वाजता पासुन महाप्रसाद वितरण करण्यात येईल.
श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळयास परिसरातील भाविक नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहुन “श्री ” च्या दर्शनाचा लाभ घेऊन आशिर्वाद प्राप्त करावा. असे आवाहन श्री गजानन महाराज मंदीर, श्री गजानन महाराज नवयुवक सेवा समिती तिवीडे ले-आऊट पांधन रोड कन्हान व्दारे केले आहे.








