spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जात पडताळणी समितीच्यावतीने सामाजिक न्याय सप्ताह साजरा.

यवतमाळ, 30  : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध उपक्रमाचे हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष सोन्नापा यमगर, उपायुक्त प्राजक्ता इंगळे तसेच संशोधन अधिकारी ज्योत्प्ना तिजारे व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

सामाजिक न्याय सप्ताहामध्ये 11 वी व 12 विज्ञान शाखा, तांत्रीक शिक्षणाकरीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी, निवडणूक व सेवा प्रयोजनार्थ प्राप्त प्रकरणे, सन 2025-26 मध्ये सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्रृटी पूर्तता कॅम्प व सुनावणीचे आयोजन घेण्यात आले. सामाजिक न्याय दिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक, निवडणूक व सेवा या प्रयोजनार्थ एकुण 316 प्रकरणे वैध ठरविण्यात आली व सामाजिक न्याय दिवशी समितीचे अध्यक्ष सोन्नापा यमगर, उपायुक्त प्राजक्ता इंगळे तसेच संशोधन अधिकारी ज्योत्स्ना तिजारे इत्यार्दीच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्र अर्जदारांना प्रदान करण्यात आले. तसेच अर्जदारांना त्रुटी पुर्ततेसाठी मार्गदर्शन करण्यात आले व तांत्रीक पदवी अभ्यासक्रमाकरीता या विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले. सामाजिक न्याय सप्ताहाला अर्जदार व जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

Popular Articles