spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्युत नविन मीटर सक्ती विरोधात समाजसेवक प्रशांत मसार, सामाजिक नागरिक आक्रमक

कन्हान :- शहरात व परिसरात नागरिकांच्या घरी, दुकानात लावलेले जुने विद्युत मिटर महावितरण व्दारे काढुन विद्युत नविन मिटर शक्तीने लावण्यात येत असुन त्या नविन मिटर ने विद्युत बिल मोठया प्रमाणात वाढुन येत असल्याने परिसरातील नागरिक भयंकर त्रस्त असल्याने समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, समाजिक नागरिकांनी क्षेत्राचे खासदार शामकुमार बर्वे हयाना निवेदन देऊन विद्युत नविन मिटर लावण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

महावितरण व्दारे विद्युत नविन मीटर सक्तीने लावण्याच्या विरोधात तीव्र संताप, जनक्षोभ दिवसंदिवस वाढत चालला आहे, या घरगुती विद्युत नविन मीटर सक्ती विरोधात समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार सह समाजिक नागरिक एकत्रित येऊन आक्रमक पवित्रा घेत, वारंवार नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महा वितरणावर रोष वाढत चालला आहे. सध्या सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही कारण नसताना घरगुती,छोटे दुकाने यांचे चालु व जुने मीटर काढुन नवीन (स्मार्ट) मीटर सक्तीने लावत आहे. ह्या नविन मीटर चे विजेचं बिल अधिक प्रमाणात येत असुन ग्राहक नागरिकांना जास्त आर्थिक भार सोसावे लागत आहे. जो अत्यंत अन्यायकारक आहे. एकीकडुन सरकार, शासनकर्ते, आरूढ सत्ताधारी सांगतात की स्मार्ट मीटर लावण्यास सक्ती करू नये, दुसरीकडे महावितरण विद्युत अभियं त्याचे नागरिकांना विजेचं बिल कमी करण्यासाठी भूल थापा देऊन नविन नविन मीटर बसवण्याचा सल्ला देत आहे. विधृत नविन (स्मार्ट) मीटरची सक्ती करून सामान्य तथा गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंडचा बोजा लादला जात आहे. तोही जबरन सहन करावा लागत आहे. आधीच सर्वसामान्य ग्राहक, नागरिक जीवनाश क वस्तुच्या महागाईने कंबरडे मोडले असुन ह्या महागा ईमुळे जनता होरपडली जात आहे. अशातच महावितर ण नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देऊ न सामान्य माणसाचे बेहाल करित असुन ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधृत नविन मीटर बसवण्याचा निर्णय तात्काल रद्द करण्यात यावा अशी मागणी रामटे क खासदार मा. शामकुमार बर्वे यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार सह मोतीराम रहाटे, सत्तू मारशेठ्टी, चंदन मेश्राम, रमेश चव्हाण, उमेश यादव, देवा चतुर, अशोक मेश्राम, सुभाष बावणे, सुनिल दूधबावणे, प्रदिप नाटकर,संदीप पंधराम, प्रल्हाद पहाडे, दुर्गेश बर्वे आदी समाजिक नागरिका सह नागरिकांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.