spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर मेट्रोच्या फ़ेज – २ अंतर्गत रीच-1A येथे  स्पॅन लाँचिंगला सुरुवात

नागपूर १ : महामेट्रो नागपूरने फ़ेज -२च्या विस्तार अंतर्गत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून रीच-1A या 17.6 किमी लांबीच्या मार्गावर (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मेट्रो स्टेशन – एमआयडीसी ईएसआर स्टेशन) पहिला 31 मीटर लांबीचा स्पॅन यशस्वीपणे लाँच करण्यात आला.

या महत्त्वाच्या कॉरिडॉर नागपूर शहराच्या दक्षिणेकडील उपनगरांशी तसेच महत्त्वाच्या औद्योगिक आणि नागरी वस्त्यांशी लास्ट माईल कनेक्टिव्हीटी सक्षम करेल. ज्यामध्ये शाळा, रुग्णालये यांचाही समावेश आहे. हा रिच 19 किमी लांबीच्या ऑरेंज लाईन मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा भाग असून जो कि, खापरी मेट्रो स्टेशन ते एमआयडीसी ईएसआर दरम्यान असेल.

हा पहिला स्पॅन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक  श्रावण हर्डीकर, संचालक (प्रकल्प)  राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला.

रीच-1A मध्ये एकूण १० मेट्रो स्टेशन असून यामध्ये इको पार्क (ऍड ग्रेड ), मेट्रो सिटी (ऍड ग्रेड ), अशोक वन, डोंगरगाव, मोहगाव, मेघदूत सिडको, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलनी, एमआयडीसी केईसी आणि एमआयडीसी ईएसआर (सर्व उन्नत – Elevated) आहे. या रिचचे कार्य पूर्ण झाल्यानंतर बुटीबोरी औद्योगिक वसाहत व नागपूर शहर यामध्ये सिमलेस मेट्रो सेवा उपलब्ध होईल.

रीच-1A मध्ये एकूण 623 स्पॅन आहेत, ज्यामध्ये 79 मीटर व 100 मीटर लांबीचे दोन विशेष स्पॅन नागपूर-वर्धा रेल्वे मार्गावर असतील. या रिच मधील सिव्हिल कार्य जानेवारी 2025 मध्ये सुरू करण्यात आली असून, संपूर्ण व्हायाडक्ट उभारणी 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या स्पॅन लाँचिंगमुळे नागपूर मेट्रोच्या महत्वाकांक्षी फ़ेज – २ वेळेत पूर्ण होण्यास गती मिळाली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.