– मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
किशोर साहू : मौदा, ता. १८: बुधवार ( दि. १७ सप्टेंबर )रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बोरी (घिवारी) ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.या सभेला गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने व राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने सहभाग नोंदविला.गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, शेतकरी, भजन मंडळ, मंदिर समिती, तरुण मंडळी तसेच ग्रामपंचायत व विविध विभागांचे अधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला. ग्रामसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट संबोधन ऐकताना गावकरी प्रेरित झाले आणि गाव एकसंघ राहून प्रगती साधण्याच्या निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
ग्रामसभेला सरपंच विशाल सेलोकर,उपसरपंच दिनेश पटले ग्रामपंचायत सदस्यगण सुषमा राऊत, संगीता गभणे, सरस्वती पंपणा, मेघा बोंबले ,नोडल अधिकारी आरोग्य विस्तार अधिकारी वरखडे,कृषी सेवक गोपाल पाठे,आरोग्य सेवक मधुकर राऊत, आरोग्य उपकेंद्र अधिकारी विशाखा कावळे,आशा सेविका रंजना चवळे,अंगणवाडी सेविका मीना पटले, दामिनी तिजारे,अंगणवाडी मदतनीस प्रतीमा मेश्राम,रोजगार सेवक गुरुदेव शेनवार,संगणक परिचालक प्रविण भुते, मुख्याध्यापक नंदकिशोर पठाले,शिक्षक मानकर ,ग्रामसंघ अध्यक्ष अश्विनी गोंधोळे, पशुसखी साक्षी मेश्राम,तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा भुते,पोलिस पाटील अभिजीत शेनवार तसे तरुण मंडळी व इतर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.




