spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र सदनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन

नवी दिल्ली :- निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने 21 जून रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली येथे योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात सहभाग पूर्णतः विनामूल्य असून इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी https://forms.gle/jTqGbD५EQJzMsqjj९ लिंकवर नोंदणी करावी.

या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभागी होऊन निरोगी, सक्रिय आणि सकारात्मक जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले आहे.

Popular Articles