spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाजीराव साखरे ई-लायब्ररीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

– शिबिराच्या माध्यमातून ५७ युनिट रक्त संकलित

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या लष्करीबाग येथील बाजीराव साखरे ई-लायब्ररी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.१४) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या माध्यमातून ५७ युनिट रक्त संकलित करण्यात आले.

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉ. पल्लवी बोंदडे व समाजसेवा अधीक्षक चेतन मेश्राम यांच्या हस्ते तसेच सहाय्यक ग्रंथपाल विशाल शेवारे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.

बाजीराव साखरे ई-लायब्ररीमध्ये आयोजित रक्तदान शिबिरामधून ५७ युनिट रक्त संकलन करण्यात आले. नागपूर शहरात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता हे रक्तदान शिबिर महत्वाचे ठरणार आहे. यावेळी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉ. पार्थ खेकरे, सिनियर टेक्निशियन अनिल बोरकर, परिचारिका रेहणुमा, रफिया, आलिना, शुभम देवकर, अनुप शेवटे उपस्थित होते. बाजीराव साखरे ई – लायब्ररी मधील विद्यार्थी सर्वश्री विशाल विशाल बरंवाल, शुभम गेडाम, गौरव महाजन, सुहास धोंगडे, तेजस खंडारे, प्रशिक उंदिरवाडे, प्रणय संगोळकर यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.