– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
मुंबई :- पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, अहिल्यानगर, वसई-विरार येथील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा गट, बहुजन विकास आघाडी आणि मनसे मधून सरपंच, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी प्रवेश केला. वसईचे बविआचे माजी नगरसेवक प्रदीप पवार, नंदकिशोर पवार, परभणीचे आबासाहेब पतंगे, कराडच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. ॲड. राहुल कुल, आ. डॉ. राहुल आवाडे, आ. मोनिका राजळे, आ. अतुलबाबा भोसले, आ. स्नेहा पंडीत दुबे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आदी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर, दूरदृष्टीवर विश्वास ठेवत परिवर्तन आणि विकास यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. वसई, विरार, नालासोपारा भागातील जनता कायम राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेसोबत राहिली आहे. केंद्र आणि राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराचे सरकार असेल तर विकासाची नवी उंची गाठणे शक्य होते. म्हणूनच सुजाण जनतेने महापालिका निवडणुकीत भरभरून मते द्यावी हे आवाहन चव्हाण यांनी केले. पायाभूत सुविधा विकास, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, परिसराचा कायापालट करण्यासाठी महायुतीचा महापौर गरजेचा आहे असेही त्यांनी नमूद केले.
भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी जि.प. सदस्य शेखर पाचुंदकर पाटील, स्वाती पाचुंदकर पाटील, दत्ता पाचुंदकर पाटील, राहुल पवार,रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव, सरपंच चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड आदींचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष जीवन बरगे, प्रदेश चिटणीस व माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, माजी नगरसेविका व माजी आरोग्य सभापती शुभांगी माळी, माजी नगरसेवक तानाजी हराळे, राजू खोत, माजी नगरसेविका दीपाली हुक्कीरे, काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते यांनी तर सातारा जिल्ह्यातील काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाचे कराडच्या माजी नगरसेविका आणि विरोधी पक्ष नेत्या स्मिता हुलवान, माजी नगरसेवक आणि माजी बांधकाम सभापती राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, संजय कांबळे यांचा भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांत समावेश आहे.
भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये वसई-विरार येथील बहुजन विकास आघाडीचे नगरप्रमुख नंदकिशोर पवार, नवदुर्गा सार्वजनिक युवा संघटक अध्यक्ष साईराज पवार, विशाल नगरचे अध्यक्ष प्रकाश जाधव, दैनिक चौफेर संघर्षचे संपादक कैलास रांगणेकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशाल नगरचे सचिव भार्गव घाडी, दिव्य मानसचे संपादक सुधीर चौधरी आदींचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यातील शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रीय समाज पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये विधानसभा संपर्क प्रमुख आबासाहेब पतंगे, ज्ञानेश्वर संसारे, सुकांत शेटे, सुरेश बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष गोपीचंद गुरव आदींचा समावेश आहे.
शेवगांव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये बालमटाकळी गावचे सरपंच डॉ. राम बामदळे, तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रसाद पवार, माजी सरपंच सतीष लांडे, उद्योगपती पांडुरंग नवले आदींचा समावेश आहे.




