spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा मुख्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

– सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप

नागपूर :- नागपूर महानगरपालिका मुख्यालयात ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत कर्मचाऱ्यांना व उपस्थितांना आज (ता.१४) राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी ‘भारत माता की जय’,’ वंदे मातरम’ असे देशभक्तीपर घोषणा देत वातावरण निर्मिती करण्यात आली.

यावेळी महापौर निता ठाकरे, सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त निर्भय जैन, मंगेश खवले, मुख्य वित्त अधिकारी सदाशिव शेळके, नगरसेवक देवेंद्र मेहर, कार्यकारी अभियंता राजीव गौतम, सुनील गजभिये, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सुनील कांबळे, प्रमोद हिवसे, जितेश धकाते, यांच्यासह इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

तत्पूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कस्तुरचंद पार्क येथे आयोजित फाळणी भयावहता स्मृती दिन कार्यक्रमाच्या मध्यामातून विभाजन विभिषिकेच्या भयावह स्मृतींची माहिती देण्यात आली. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी उपस्थितांना भयावह स्मृतींची माहिती दिली. यावेळी मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ध्वज फडकवून भारताच्या फाळणीदरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य निर्दोष नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फाळणीच्या काळातील अमानुष अत्याचार, विस्थापन आणि असंख्य कुटुंबांच्या दुःखद आठवणींचे स्मरण करत, राष्ट्राची अखंडता, एकता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Popular Articles