– अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार यादीत नाव आढळल्यास BLO शी तात्काळ संपर्क साधा
57-नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात Special Intensive Revision (SIR) अंतर्गत Enumeration Form (EF) जमा करण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2026 आहे.
ज्या मतदारांना Enumeration Form प्राप्त आहे परंतु अद्याप भरून BLO कडे जमा नाही, तसेच ज्या मतदारांशी BLO यांचा संपर्क होऊ शकलेला नाही किंवा जे मतदार भेटीच्या वेळी घरी उपलब्ध नव्हते, त्यांनी संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधावा.
ज्या मतदारांबाबत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार नोंद किंवा इतर कारणाने प्राथमिक मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रांवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या NIC संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे मतदारांनी सदर यादी तपासावी. आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव अशा यादीत आढळल्यास तात्काळ संबंधित BLO शी संपर्क साधून आवश्यक माहिती व EF बाबतची कार्यवाही पूर्ण करावी.
सर्व पात्र मतदारांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता 17 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 57-नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.





