spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अग्निशमन विभागाच्या मॉक ड्रिल ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नागपूर १९ : नागपूर शहराचा भौगोलिकरित्या विकास झाल्याने व त्याच बरोबर लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होवुन शहरात गगनचुंबी इमारती, शॉपींग मॉल, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, हॉस्पीटल, गर्दीचे बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, शासकीय इमारती, स्लम वस्ती. इत्यादी अस्तिवात आल्याने अग्नि दुर्घटनाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अश्या परिस्थिती विभागाला समर्थपने कार्य करण्यास व नागरिकांमध्ये अग्निशमन कार्यासंबधी जागृकता निर्माण होण्याच्या दृष्टीने शहरातील विविध क्षेत्रात सुरु असलेल्या शाळा, कॉलेज, महाविद्यालय येथे मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात आले.
अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागातील सिव्हिल अग्निशमन केद्रामार्फत बिशप कॉटन हायस्कुल, सिव्हिल लाईन नागपूर येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस ६३० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते., सुगतनगर अग्निशमन केंद्रामार्फत महात्मा गांधी सेंट्रल हायस्कुल व ओंकारलाल सिंधु हायस्कुल येथे संयुक्तपणे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस २००० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते., गंजीपेठ अग्निशमन केंद्रामार्फत निराला हायस्कुल, सि.ए. रोड येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस ३४० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.. लकडगंज अग्निशमन केंद्रामार्फत आदर्श विद्या मंदीर, हिवरी ले आऊट येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस ४२५ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते., त्रिमुर्ती नगर अग्निशमन केंद्रामार्फत स्कुल ऑफ स्कॉलर हायस्कुल, अत्रे ले आऊट, प्रतापनगर येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस २६५ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते., नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रामार्फत साईनाथ विद्या मंदीर, प्रगती नगर येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस ६३७ विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते., कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रामार्फत पंडीत बच्छराज हायस्कुल, मेडीकल चौक येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस ६४० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.. पारडी अग्निशमन केंद्रामार्फत नागपूरे विद्यालय, भरत नगर येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस ६९० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते., कळमना अग्निशमन केंद्रामार्फत दि प्रसीडेंट छात्र जागृती ट्रस्ट येथे मॉकड्रिल आयोजीत केली त्यावेळेस ४२५ विद्यार्थी उपस्थित होते. याप्रमाणे एकूण ६०५२ अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षीका हे प्रात्याक्षिका दरम्यान उपस्थित होते.
अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागातील नमुद अग्निशमन केंद्रामार्फत उपरोक्त शैक्षणीक संस्थेमधील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षीका यांना जनजागृती उपक्रमातून “आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजना” याबाबत अग्निशमन साहित्य हाताळण्याची माहिती व अग्निशमन सुरक्षा बचाव साहित्याची माहिती तसेच अग्निशमन कार्यासंबधीची माहिती चित्रफित दाखवुन व प्रात्याक्षिकाच्या माध्यमातुन देण्यात आली.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.