spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वडोदा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत वडोदा येथील अंगणवाडी केंद्रात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून लसीकरण करण्यात आले. बालकांना पोलिओमुक्त व निरोगी भविष्य देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना प्रत्येक बालकाला वेळेत पोलिओचे डोस देण्याचे आवाहन केले. लसीकरणामुळे पोलिओसारख्या गंभीर आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य असून, प्रत्येक पालकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला वडोदा ग्रामपंचायतीचे सरपंच राजू थोटे, उपसरपंच दत्तू हलमारे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना गाडबैल, डॉ. भोयर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच मोठ्या संख्येने पालक व लहान मुले उपस्थित होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Popular Articles