spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘एक तारीख, एक तास एक साथ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

नागपूर, ०२  : स्वच्छ, सुंदर नागपूरसाठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत मंगळवारी (ता.१) मनपाच्या दहाही झोनमध्ये आरोग्याच्या संदर्भात सहा मूलमंत्रांवर भर देणाऱ्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियान अंतर्गत ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ उपक्रम राबविण्यात आला.

स्वचछता विभागामार्फत प्रत्येक झोनमध्ये स्वच्छता करण्यात आली. लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग ३६ मध्ये सुर्वेनगरातील स्नेहनगर, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक १२ मधील साईनगर, जागृतीनगर फ्रेंड्स कॉलन, हनुमान नगर झोन  मधील प्रभाग ३४ मधील मानेवाडा जुनी बस्ती, धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील नवीन बाभुळखेडा, द्वारकापुरी, कौशल्यानगर, नेहरूनगर झोन मधील प्रभाग क्रमांक ३० मधील श्यामबाग, गांधीबाग झोन मधील प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरीया चौक, सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग क्रमांक ५ मधील आनंदनगर, शाहू मोना पंचवटी, लकडगंज झोन मधील प्रभाग क्रमांक २४ मधील सूर्यनगरात, आशीनगर झोन मधील प्रभाग ३ मधील गांधी चौक तर मंगळवारी झोन मधील प्रभाग १ मधील सिंधुनगर सोसायटीमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली.

यावेळी नागरिकांना पावसाळ्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय नागरिकांना हाताची स्वच्छता राखणे, घराची स्वच्छता राखणे, परिसर स्वच्छ ठेवणे, शौचालयाची स्वच्छता राखणे, नाल्या व सांडपाण्याची जागा स्वच्छ ठेवणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या संदर्भात जनजागृत करण्यात आले.

Popular Articles