spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धा

पद्मभूषण मेजर ध्यानचंद  यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विनम्र अभिवादन

नागपूर ३० : हॉकीचे जादूगार खेलरत्न पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केले. पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ हॉकी असोसिएशन मैदान स्थित मेजर ध्यानचंद यांच्या म्युरला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका क्रीडा विभाग आणि विदर्भ हॉकी असोसिएशन यांच्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस तथा भारतीय हॉकीचे जादूगार खेलरत्न पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ हॉकी असोसिएशन मैदान येथे विदर्भस्तरीय आंतर जिल्हा (ज्युनिअर) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, विदर्भ हॉकी असोसिएशनचे समन्वयक  कृष्णा जोशी, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकर, माजी नगरसेवक  किशोर जिचकार, द हॉकी महाराष्ट्राचे सचिव  रणवीर सिंग, नैशनल अंपायर रवि फ्रांसेस, माजी नगरसेवक  संजय बंगाले,  उपेंद्र कोठेकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  संजय लोखंडे, राहुल नावंदे, शाहिद सैयद, समीर पठान,वैभवजी तिजारे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.