Home Latest News वादळ-वारा क्षणभर, पण लाईट जाते वारंवार : वडकी महावितरणचे वास्तव

वादळ-वारा क्षणभर, पण लाईट जाते वारंवार : वडकी महावितरणचे वास्तव

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>संजय कारवटकर&comma; प्रतिनिधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> वडकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे&period; पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत&period; थोडासा वारा&comma; हलका पाऊस किंवा विजा कडाडल्या की रात्रभर लाईट बंद — अशी सध्याची परिस्थिती आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे वडकी परिसरातील येवती&comma; चहाद&comma; खडकी&comma; परसोडा आदी गावांमध्ये विजपुरवठा अनियमित होत आहे&period; कधी दोन तासांनी लाईट येते तर कधी रात्रभर परतच येत नाही&period; याचे नेमके कारण मात्र नागरिकांना समजत नाही&period; त्यामुळे &OpenCurlyDoubleQuote;कर्मचाऱ्यांचा आळशीपणा आणि अभियंत्यांचे नियंत्रण नसणे” हेच कारण असावे&comma; अशी चर्चा परिसरात सुरू आहे&period; रात्रभर बंद असलेली लाईन सकाळी पाच वाजता मात्र सुरू होते&comma; याकडेही लोकांचे लक्ष वेधले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>लाईटबिल मात्र अवाढव्य येते&comma; पण विजपुरवठा खंडित झाला की महावितरणकडून तत्परता दिसत नाही&period; उलट&comma; बिल न भरल्यास लगेच कनेक्शन कापले जाते&period; या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ येवती येथील काही युवकांनी अर्धनग्न अवस्थेत वडकी महावितरण कार्यालय गाठले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;वादळ-वारा क्षणभर&comma; पण लाईट जाते वारंवार” — अशी चर्चा आता सर्वत्र ऐकू येते&period; त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वडकी परिसरातील जनतेला या त्रासातून मुक्त करावे&comma; अशी नागरिकांची मागणी आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version