spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ST चा प्रवास आता आणखी सोपा; प्रवाशांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ सुविधा सुरू

– भंडारा विभागातील सर्व आगारांत नोंदणी सुरू; १९९ रुपयांत मिळणार ‘NCMC’ कार्ड

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवाशांच्या सोयीसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) ही स्मार्ट कार्ड सुविधा सुरू केली आहे. भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सर्व बसस्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रवाशांना आता रोख रकमेऐवजी या कार्डद्वारे तिकीट काढता येणार आहे.

काय आहेत स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये?

या कार्डद्वारे प्रवास केल्यास शासन निर्णयानुसार मिळणारी भाडे सवलत (उदा. महिला, जेष्ठ नागरिक) थेट लागू होईल.

हे कार्ड आधार कार्डशी लिंक असून त्यावर प्रवाशाचे नाव आणि फोटो असेल.

कार्डचे रिचार्ज यूपीआय (UPI) किंवा कार्ड वॉलेटद्वारे सहज करता येईल.

नवीन स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाईल.

सवलतीसाठी आवश्यक कागदपत्रे:

विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:

🔹 महिला व ज्येष्ठ नागरिक : आधार कार्ड.

🔹 अमृत ज्येष्ठ नागरिक : आधार कार्ड.

🔹 दिव्यांग व दृष्टीहीन : वैश्विक ओळखपत्र (UDID Card).

🔹 विद्यार्थी : सरल आयडी क्रमांक (SARAL ID).

🔹 इतर सवलती : संबंधित शासकीय प्रमाणपत्र.

🔹 सवलत नसलेले सर्वसाधारण प्रवासी : मोबाईल ओटीपी (OTP).

भंडारा विभागातील भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा आणि पवनी या सर्व आगारांच्या बसस्थानकांवर स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, भंडारा यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.