चिन्मय मिशनतर्फे आयोजित गीता परीक्षेमध्ये एच.एस. महात्मे संस्कार विहार शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेमध्ये अशिनी खोब्रागडे हिने प्रथम क्रमांक, निहारिका डोंगरे हिने द्वितीय क्रमांक, तर अद्वैत काठोके आणि अथर्व नंदनवार यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तसेच परीक्षेला सहभागी झालेल्या एकूण 27 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्र देण्यात आले व शाळेचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद व मुख्याध्यापिकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.








