पांढरकवडा :- शहरातील बस स्थानक समोरील जय भोले कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी रॉबिन बंन्सल यांनी सोमवारी दुपारी धाड टाकून सहा जुगाऱ्याला ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच कलम ४९ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पांढरकवडा येथील अधिकारी रॉबिन बंन्सल यांना बसस्थानक समोरील जय भोले कॉम्प्लेक्स मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल यांनी पथकासोबत सोमवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी जय भोले कॉम्प्लेक्स मध्ये छापा टाकला असता काही इसम ‘चेंगड’ नावाचा जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून मोठी रोकड, मोबाईल आणि गंजीपत्ते जप्त करण्यात आले. कारवाई दरम्यान निखिल शालीकराम बोरेले (२९), रंजीत फुलसिंग चव्हाण (४२), मनिष कमल शर्मा (४८), वैभव बापुराव गंज्जीवार (३०) रा. सर्व पांढरकवडा, पंकज प्रदिप नेमणवार (४०) रा. आकोली (बु) बाबाराव गणपत बोपटे (५५) रा.गवराई यांच्याकडून एकूण १ लाख ३५ हजार ६०० रुपये रोख, गंजीपत्ते तसेच ६ मोबाईल ५० हजार असा एकूण १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी अधिकारी रॉबिन बंन्सल, पोलीस जमादार प्रशांत चौकाडे, महेश नाईक, इम्रान खान, मनोज अभ्यंकर, रवि सिंहे, चालक राजु सुरोशे यांनी पार पाडली.
Home Latest News जय भोले कॉम्प्लेक्समधिल जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बंन्सल यांची कारवाई



