spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

थर्ड ओपन विदर्भ लेव्हल योगासन स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चाचेर च्या विद्यार्थिनींचे यश 

किशोर साहू, मौदा :- नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या थर्ड ओपन विदर्भ लेव्हल योगासन कॉम्पिटिशन 2026 या स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीच्या रोहिणी करकाडे व आरजू गजभिये या विद्यार्थिनींनी प्रथमच सहभाग नोंदवत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या विद्यार्थिनींनी योगासनातील विविध आसनांचे अचूक सादरीकरण, संतुलन, शिस्त व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या बळावर यश संपादन केले.

पहिल्याच सहभागात मिळालेला हा विजय जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक ठरला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये योगासन व क्रीडा क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण होत असून या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

या यशामुळे भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देखील भरीव कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यार्थिनींच्या या कामगिरीबद्दल मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन साहारे, माजी अध्यक्ष किरण बरबटे सह समस्त सदस्यगण व ग्रामवासियांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Popular Articles