– मरीन ड्राईव्हवर गुन्हा दाखल करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचा अडथळा; हजारो समर्थकांसह बारामती पोलीस ठाण्यात धडक
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ‘अजित दादा’ यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाने आता एक नवे आणि खळबळजनक वळण घेतले आहे. या घटनेमागे मोठा ‘घातपात’ झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आज बारामती पोलीस ठाण्यावर आमदार रोहित पवार, युवेन्द्र पवार आणि शेकडो वकिलांसह हजारो समर्थकांनी धडक दिली.
भंडारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले की, “गेल्या महिन्याभरापासून रोहित पवार या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. या विमान अपघातात घातपात झाल्याचे अनेक महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे घेऊन मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी गेले असता . मात्र, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला आणि एफआयआर नोंदवण्याचे काम दबावापोटी थांबवण्यात आले.”
दुचाकी अपघाताची नोंद होते, मग उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूची का नाही?
यावेळी आक्रमक पवित्रा घेत नेत्यांनी प्रशासनाला जाब विचारला. “राज्यात साध्या दुचाकीचा अपघात झाला तरी त्याची पोलीस दप्तरी रीतसर नोंद होते. मग राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात मृत्युमुखी पडतात, तरीही त्यांच्या मृत्यूची साधी नोंद एकाही पोलीस स्टेशनला का झाली नाही? ही व्यवस्था नेमके काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे?” असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला.
मुंबईत दाद न मिळाल्याने अखेर बारामती पोलीस स्टेशन गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी बारामती पोलीस ठाण्याबाहेर युवा नेते युवेन्द्र पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी शेकडो वकीलही कायदेशीर प्रक्रियेसाठी हजर होते. रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडली की, “पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा. जर आज गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही आणि पुढची तीव्र कायदेशीर कारवाई कर. या”संपूर्ण संघर्षाला पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती चरण वाघमारे यांनी दिली. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मुव्हमेंटला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. जोपर्यंत या मृत्यू प्रकरणातील गुढ उकलत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.




