spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके जयंती उत्सव; पुसद येथे आदिवासी महिला मेळावा व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा

यवतमाळ :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंर्तगत स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित साधुन जिजामाता मंगल कार्यालय, पुसद येथे आदिवासी महिला मेळावा व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा मोहिनी इंद्रनील नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे तसेच प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर उपस्थित होते.

सर्व पथम स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके, वीर बिरसा मुंडा व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शासकीय आश्रमशाळा पुसद व वडगाव शिंदे येथील विद्यार्थिनींनी सादर मनमोहक आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन प्रगती साधावी, असे आवाहन मोहिनी नाईक यांनी यावेळी काढले.

महिला बचत गटांना धनादेश वाटप

या कार्यक्रमाच्या वेळी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत लाभार्थी महिला बचत गटांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.

शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थी व पालकांचा सत्कार

स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय सेवेत निवड झालेल्या तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी उपसंचालक पदावर निवड झालेल्या नेहा कबले यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. गौरव पाचपुते एम बी बी एस, सुरेश धनवे आणि दिक्षांत रामटेके यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी शासनाच्या विविध विभागांमध्ये निवड झालेल्या १५ आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके आदिवासी संघर्षाचे प्रतीक

 

आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. डॉ. आरतीताई फुफाटे यांनी शिक्षणाबद्दल महत्व सांगितले. याप्रसंगी मतिनजी भोसले, माधवराव वैद्य, संभाजीराव सरकुंडे, नारायण कराळे व गजानन उघडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

 

कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच समिती सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत कोटुरवार यांनी केले. सूत्रसंचालन नारायण राऊत व समाधान जाधव यांनी केले, तर आभार केतन कवडी यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.