अमरावती :- कोळी महादेव व महादेव कोळी समाजाला संबंधित उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्यामार्फत अनुसूचित जमातीचे (ST) जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य कृती समिती महासचिव उमेश ढोणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. शिंदे अमरावती येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयात आले असता, या प्रलंबित प्रश्नावर स्वतंत्र बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी ढोणे यांनी केली.
कोळी महादेव समाजाच्या ST प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे उमेश ढोणे यांची निवेदनाद्वारे मागणी









