spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तेली समाजाचा वर-वधू परिचय मेळाव्याचे उद्घाटन व “सुयोग” या वर-वधू परिचय पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न

नागपूर :- नागपुरातील तेली समाजाचे जवाहर विद्यार्थी वस्तीगृह व सभागृह, सिव्हिल लाइन्स, नागपूर तर्फे त्यांचे सभागृहात १७ मे रोजी तेली समाजासाठी आयोजित वर -वधू परिचय मेळाव्याचे उद्घाटन व याप्रसंगी प्रकाशित “सुयोग” या वर वधू परिचय पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य अध्यक्ष खा. रामदास तडस यांचे हस्ते करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्षस्थानी जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष शेखर  सावरबांधे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता नगरसेवक संजय महाकालकार, महाराष्ट्र प्रांतिकचे कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे, संताजी स्मारक समितीचे डॉ. यशवंत खोब्रागडे, सामूहिक विवाह समितीचे ॲड. पुरुषोत्तम घाटोळे, विनायक तुपकर,केशवानंद सुरकार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रामदासजी तडस यांनी सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य यांचे अभिनंदन करून त्यांचे हातून हे विद्यार्थी गृह भव्य दिव्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच नागपुरात विद्यार्थी म्हणून असताना त्यांनी या वस्ती गृहात वास्तव्य केले,त्याची परतफेड म्हणून त्यांनी वस्ती गृहास एक लाखाची देणगी जाहीर करून त्याचे व्याजाचे रकमेतून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी अशी पेक्षा व्यक्त केली व सर्वांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी जवाहर विद्यार्थी गृहाचे मुख्य कार्यवाह गंगाधर काचोरे, उपाध्यक्ष नरेंद्रकुमार दिवटे, कोषाध्यक्ष बालानंद टापरे, सहकार्यवाह हर्षवर्धन बेले, संचालक सर्वश्री, प्रा.डॉ.रमेश पिसे, सुखदेव वंजारी, प्रदना बडवाईक, लोकनाथ भुरे, चंद्रकांत ढोबळे, कृष्णा घुघुसकर, विजय (बंडू) मोटघरे, अनिल साखरकर, प्रकाश तीळगुळे, प्रफुल रेवतकर, हरीश जयपूरकर, प्रवीण अंबागडे, हरीश दांडेकर, रवी उराडे, देवेंद्र वाडीभस्मे, नंदकिशोर धोटे विशेष उपस्थित राहून सक्रिय होते. तसेच मोठ्या प्रमाणावर लग्नास इच्छुक वर -वधू व त्यांचे पालक, समाजबंधू, भगिनी हजर होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.