नागपूर :- राष्ट्रीय ओबीसी मुख्य मोर्चा च्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली तेव्हा नितीन चौधरी यांनी सांगितले की, ओबीसी न्यायाचे व समतेच्या फुले शाहू आंबेडकर पीरिअर, लोहिया समाजवादी विचारांचा संघर्ष 36 च नव्हे पुढे असाच चालू ठेवण्यासाठी संदेश देण्यासाठी संघटनेतर्फे वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन केलेले आहेत. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा 36 वा, वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी 22 मे रोजी, सुभाष रोडवरील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे सायंकाळी ६:३० वाजता. आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी हा सोहळा ओबीसीची सत्यशोधक वाटचाल या संकल्पनेवर साजरा करण्यात केला जाणार असून या दरम्यान संघटनेच्या अधिकृत वेबसाईड robcmm विमोचन सोबत करण्यात येणार आहे. संकेतस्थळाचे लोकार्पण सोहळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुनील केदार, उद्घाटक प्रसिद्ध विचारवंत अशोक भारती, तर विशेष निमंत्रित काटोलचे माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख आणि सत्यशोधक कार्यकर्ते प्रा. नूतन माळवी यांची उपस्थिती राहतील. या सोहळ्यात सत्यशोधक चित्रपट निर्माते सुनील शेळके आणि जेष्ठ नाटककार संजय जीवने यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच अर्चना देशमुख, अविनाश ठाकरे, अस्लम बारी, भाऊराव तुमसरे, एडवोकेट भूपेश पाटील, यांचा गौरव केला जाणार आहे. अशी माहिती मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी पत्रपरिषदेत पत्रकारांना दिली. पत्रपरिषदेत नितीन चौधरी, अँड अशोक यावले, कृष्णकांत मोहोड भूषण दडवे, गीताताई महाले, संजय भोगे, नकवी पटेल, गुणवंत देशकर, दिवाकर मोहोड, डॉ. अरुण वराडे आणि राम वाडीभस्मे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा वर्धापन दिवस 22 मे रोजी, 36 व्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्याचे आयोजन व मान्यवरांचा सत्कार
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.