– जिल्हाधिकारी यांना शिवसेना महिला आघाडीचे निवेदन
नागपूर :- शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात नवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना भेटून सोमवारी कॉर्टर परिसरातील आरोग्य केंद्राच्या बांधकाम सेवासुविधा संदर्भातील काम मागील अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे व तसेच शासनाकडून निधी उपलब्ध असून देखील संबंधित विभागाकडून टेंडर प्रक्रिया व प्रशासकीय कारवाई मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे सदर विलंबामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळत नसून महिला, जेष्ठ नागरिक, लहान मुले, स्थानिक नागरिकांना, मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र नाराजी निर्माण होत आहे. तसेच संबंधित कामा संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याची दिसून आल्यामुळे शासनाचा निधीचा योग्य वापर वेळेत न झाल्यास सार्वजनिक हिताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निवेदना मार्फत जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद याच्या निदर्शनात आणून दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल येथील अधिष्ठाता राज गजभिये यांना बोलावून संबंधित आरोग्य केंद्राच्या विषयावर चर्चा केली व लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेस उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले, तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे सुद्धा कडक शब्दात सुनावले या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची निर्देश राज गजभिये यांना देण्यात आले. नागरिकांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर तसेच उपजिल्हा संघटिका मंजुषा पाणबुडे उपस्थित होत्या.