– नागपूरच्या हिलटॉपच्या राजाला पहिले विदर्भातील मानाचे पारितोषिक
नागपूर :- एन डी टी वी नेशनल न्यूज़ चॅनल तर्फे राज्यस्तरीय गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धा- 2025 बिकेसी बांद्रा मुंबई येथे आयोजित करण्यात आली या स्पर्धेत महाराष्टातील अनेक गणेश मंडळानी सहभाग घेतला यामध्ये विदर्भातील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले व सामाजिक देखावे निर्माण करणारे व देशामध्ये वेगळी थीम आयोजित करणारे एकमेव मंडळ एकता गणेश उत्सव मंडळ हिलटॉप नागपूर येथील हिलटॉपच्या राजाने बाजी मारली व पहिले स्थान पटकावले व तर महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक अविनाश ढाकणे व मुंबई एनडीटीवी मराठीचे कार्यकारी संपादक जितेंद्र दीक्षित यांचे हस्ते एकता गणेश उत्सव मंडळ हिलटॉप चे संयोजक आमदार प्रकाश गजभिये यांचे अभिनंदन करून त्यांना सन्मानचिन्ह पुरस्कार व मानपत्र देण्यात आले.




