spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चिचाळा मार्गतील पेंच कालव्यावरील पूल वाकला

– रामटेक-चिचाळा मार्गावरील जड वाहतुक थांबविली

– पाटबंधारे विभागाच्या वेळीच सतर्कतेने अनर्थ टळला

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- चिचाळा गावाजवळील पाटबंधारे विभाग अंतर्गत येणाऱ्या पेंच डाव्या कालव्यावरील पुलाला अचानक मध्यभागातून वाक आला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पाटबंधारे उपविभाग रामटेकचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी त्वरित स्वतर्कता बाळगत महसूल व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पुलाच्या दोन्ही साईडला बॅरिकेट्स लावून व कर्मचारी तैनात करून जड वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.

उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल इ.स. १९८० दरम्यान बांधला गेलेला होता. म्हणजे जवळपास ४५ वर्ष या पुलाने टिकाव धरला मात्र शनिवार (दि.१३) सप्टेंबरला दुपारच्या सुमारास अचानक या फुलाला मध्यभागातून वाक आला. दरम्यान ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पाटबंधारे विभागाला कळविले यावेळी येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी त्वरित सतर्कता बाळगत महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला. पुलाच्या उपाययोजनाबाबत विवेक झाडे यांना विचारणा केली असता ‘ सध्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्याच पुलाचे बांधकाम करता येणार नाही ‘ असे त्यांनी सांगितले. जड वाहतूकदारांनी बॅरिकेट्स काढून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.