spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत सिहोरा सरपंच पदाच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले ; कार्यक्रम जाहीर मोर्चे बांधणी सुरू

हंसराज,प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- तुमसर तालुक्याची व्यापार नगरी व राजकारणाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सिहोराच्या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षाच्या नजरा लागलेल्या आहेत.सध्या ग्रामपंचायत सिहोराचा कारभार प्रभारी सरपंचाच्या खांद्यावर आहे.कोण बनेगा ग्रामपंचायत सिहोराका करोडपती सरपंच ही चर्चा सिहोरा व परिसरात चांगलीच जोर धरून आहे.सरपंच पदासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत सुद्धा थेट सरपंच निवडला जाईल हे येथे उल्लेखित आहे.

तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये रिक्त असलेल्या सरपंच व सदस्य पदाच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले असून कार्यक्रम जाहीर झाले आहे. राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी धडाक्यात सुरू झाली आहे.यात ग्रामपंचायत सिहोरा, मुरली(सि), बपेरा (आं), गोंदेखारी, बपेरा (सि) व वाहणी ग्रामपंचायतचा समावेश असून ग्रामपंचायत सिहोरा,गोंदेखारी व मुरली ह्या महिलांसाठी राखीव आहेत.यात बपेरा (आं) नामाप्र, मुरली अनुसूचित जमाती स्त्री, बपेरा (सि) व वाहणी सर्वसाधारण तर ग्रामपंचायत सिहोरा नामाप्र स्त्रीसाठी राखीव आहे.

पद रिक्त असलेल्या व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सिहोरा, वाहनी, बपेरा (सि), गोंदेखारी, बपेरा (आं), मुरली (सि), गोबरवाही, मांगली (दे), मीटेवाणी, सुकळी (दे), माडगी, देवाडी, खैरलांजी, हरदोली (सि), रोंघा व परसवाडा (सि) या ग्रामपंचायतीचा समावेश असून यातील सरपंच व सदस्यांचे निधन, राजीनामा दिल्यामुळे किंवा इतर कारणामुळे पद रिक्त झाले आहेत त्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका घेण्याचे कार्यक्रम जाहीर झाले असून प्रभाग निहाय अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी ला असून यादीवर हरकत वा सूचना नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख 16 ते 20 फेब्रुवारी असल्याचे उल्लेखित आहे.

Popular Articles