किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर येथील श्री शंकर देवस्थान मंदिर व समस्त ग्रामवासी यांच्या सौजन्याने 10 फेब्रुवारीपासून भागवताचार्य ह भ प योगेश चकोले महाराज यांच्या मधुर वाणीने सुरू असलेल्या अखंड श्रीमद् भागवत व शिवपुराणकथा ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्य आज रविवार (ता. 15 फेब्रुवारी)ला दुपारी बारा वाजता दरम्यान रामधून सह गावातील मुख्य रस्त्यांमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सहभागी भाविकभक्त ठिकठिकाणी करत असलेल्या हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण चाचेरनगरी दुमदुमली होती.

याप्रसंगी माजी जि प सदस्य कैलास बरबटे, चाचेर सरपंचा लुम्बिनी महेश कलारे ,भाजपा किसान आघाडी महामंत्री तथा खंडाळा (गांगणेर) सरपंच संकेत झाडे, उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती उपसभापती खेमराज चाफले, डॉ. दिनेश बादुले,मंत्री विनोद कोपरकर, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष संजूदादा वाघमारे, सदस्य नंदू मेहर,काँग्रेसचे जि प चे भावी उमेदवार तथा माजी सरपंच मदन बरबटे, कृष्णा टिकले,शंकर झलके,महेश कलारे, उपसरपंच रवींद्र ठाकरे, धनराज हारोडे, मोतीराम घरजाळे,ग्रामपंचायत सदस्य शैलेश कोपरकर, सामाजिक कार्यकर्त अशोक बावनकुळे, मल्लू गडे, अजय वाघमारे, हर्षद बावणे, शंकर बावनकुळे, राहुल लांजेवार , घनश्याम बिसने सह गावातील परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने मुख्य रस्त्यांवर व चौकाचौकात ठिकठिकाणी शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविक भक्तांसाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अल्पोहार व शरबतची व्यवस्था करण्यात आलेली होती.
यशस्वीतेसाठी श्री शंकर देवस्थान मंदिर कमिटीचे पदाधिकारी गोपीचंद राऊत ,दिलीप घाटे ,किरण बरबटे, चेतन टेंभरे, प्रशांत बरबटे, चंदू देऊळकार, मनोज वानखेडे, लहानु डुंबरे, सुरेंद्र टेंबरे,येरपोई मामाजी, रमेश खंडाईत ,उदय नगरे, राहुल बिसणे, प्रशांत राऊत, प्रज्वल डुंबरे ,रोहित बावणे ,समीर झाडे, राजू धोटे ,विनायक किटे, राकेश घाटे, प्रफुल बादोले, वैभव राऊत अनिकेत लांजेवार, अनिल खंडाईत, विष्णू अढावू, विक्की गुरव, अमित खंडाईत, सचिन बादोले सह समस्त सदस्य गणांनी परिश्रम घेतले व समस्त ग्रामवासियांनी सहकार्य केले.




