spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ड्रायलीन काँक्रीटवर टाकण्यासाठी आणलेले पोत्याचे बंडल, पंधरा दिवसापासून रस्त्याशेजारी तसेच पडून, साडेपाच करोड अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या धानोली- तोंडली- खिडकी या सिमेंट रस्त्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह?

किशोर साहू, मौदा :- 5 मे पासून साडेपाच करोड अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या धानोली – तोंडली – खिडकी या रस्त्याचे सिमेंट रस्ता बांधकामाला तीव्र उन्हाळ्यात सुरुवात झाली असून, या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या ड्रायलीन काँक्रेट च्या मजबुतीकरणाकडे गोंदिया येथील कंत्राटदार आवेश घनीवाला याचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप धानोली,तोंडली व खिडकी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

रस्त्यावर टाकण्यात आलेल्या ड्रायलीन काँक्रीटच्या मजबुती करण्यासाठी 15 मे पासून पोत्याचे बंडल आणण्यात आलेले आहे. ते ड्रायव्हिंग काँक्रेटवर हातरून, त्यावर सकाळ – संध्याकाळ दोनदा पाणी मारणे तीव्र उन्हाळ्यात अपेक्षित असताना, ते पोत्याचे बंडल पंधरा दिवसापासून 31 मे पर्यंत तसेच रस्त्याशेजारी पडून आहेत, पाण्याअभावी ड्रायलीन काँक्रेट उखडू लागलेले आहेत. त्यामुळे या सिमेंट रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत?

ड्रायलीन काँक्रीटचे मजबुतीकरण होऊ न देता लगेच त्यावर प्लेन काँक्रेट टाकण्यास सुरुवात झालेली असून, प्लेन काँक्रीटवरही तीव्र उन्हाळ्यात एकदाच पाणी मारण्यात येत असल्याचे, तोंडली येथील सामाजिक कार्यकर्ते विकास ढेंगे यांनी सांगितले. याबाबत गोंदिया येथील रस्त्याचे कंत्राटदार आवेश घनीवाला यांच्याशी दोनदा भ्रमणध्वनीवरून व एकदा प्रत्यक्ष भेटून रस्ता मजबुती करण्याबाबत त्यांचे सुपरवायझर व कामगाराकडून दुर्लक्ष होत असल्याचे त्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, रस्त्याचे सुपरवायझर आस्तिक ढगे हे मला ग्रुप वर दोनदा टँकरने पाणी टाकत असल्याचे दररोज व्हिडिओ सेंड करत आहेत. रस्त्याचे सुपरवायझर व कामगार रस्त्यावर दिवसातून दोनदा पाणी मारत आहे तर ड्रायलीन काँक्रेट का उखडले? असा सवालही निर्माण झालेला आहे. त्यामुळे संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अभियंतांनी व प्रशासन विभागाने विशेष लक्ष देऊन रस्ता बांधकाम मजबूत व टिकाऊ व्हावा अशी मागणी या रस्त्यावरून नियमित येणे जाणे करणाऱ्या वाहनधारक, धानोली, तोंडली, खिडकी येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर केली आहे.

Popular Articles