– शाळा बंद, शिक्षक ताणावखाली; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवण्याची मागणी
कन्हान :- ग्रामिण भागातील मराठी शाळा आधीच अस्तित्वासाठी झगडत असताना निवडणुक प्रक्रिया व विविध शाळाबाह्य शासकीय कामांचा वाढता भार शिक्षण व्यवस्थेवर घाला घालत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नागपुर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, कन्हान येथे १ व ८ जानेवारी २०२६ रोजी शाळा बंद ठेवावी लागल्याने शिक्षण विभाग व महा नगरपालिकेच्या यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
नगर सुधार समितीने शाळा बंद ठेवण्याबाबत खुलासा मागितल्यानंतर मुख्याध्यापक प्रविणकुमार प्रेमराज साबळे यांनी सविस्तर स्पष्टीकरण सादर केले आहे. दि. १ व ८ जानेवारी रोजी आयुक्त तथा निवडणुक अधिकारी, नागपुर महानगरपालिका यांच्या आदे शानुसार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवडणुक प्रशिक्षणासाठी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे उपस्थित होते. त्या दिवशी शाळेत केवळ दोन शिपाई उपलब्ध होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह अध्यापन करणे अशक्य असल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या शाळेत आधीच तीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार ही पदे मंजुर असुनही समायोजन प्रक्रियेला स्थगिती असल्या ने भरती रखडली आहे. याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद नागपुर यांना वेळोवेळी देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्य वाही झालेली नाही. ग्रामिण भागातील मराठी शाळां ची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विद्यार्थीसंख्या घटत असुन पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत आहे. परिणामी मराठी शाळांतील शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थी टिकवण्यासाठी अक्षरशः दारोदारी जाऊन पालकांची समजुत काढावी लागत आहे. विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, इतर शैक्षणि क सोयी उपलब्ध करून देणे, वेळोवेळी पालकांशी संवाद साधणे अशी अनेक कामे शिक्षक स्वतःच्या खिशातुन खर्च करून करित आहेत. याच बरोबर शास नाकडुन निवडणुक, जनगणना, सर्वेक्षण, स्वच्छता मोहिमा, तसेच एबीसी (Animal Birth Control) कार्यक्रमांतर्गत शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही शाळांवरच टाकण्यात आली आहे. या शिक्षण बाह्य कामांमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचा थेट फटका ग्रामिण विद्यार्थ्यांना बसत आहे. कोविडनंतर झालेले शैक्षणिक नुकसान अद्याप भरून निघालेले नाही. त्यातच शाळा बंद, शिक्षकांची कमतरता आणि वाढता ताण यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होत आहे. “बिचारे मराठी शिक्षक काय करणार आणि गरीब ग्रामिण विद्यार्थ्यांचे काय होणार?” असा सवाल आता खुलेपणाने उपस्थित केला जात आहे. शिक्षकां वर वाढता मानसिक व शारीरिक ताणही गंभीर बाब ठरत आहे. अति कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येत असुन त्याचा परिणाम अध्याप नावर होत आहे. ग्रामिण भागातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची नितांत गरज असताना शासना कडुन मात्र त्यांना सतत शाळा बाह्य कामांत गुंतवले जात असल्याचा आरोप होत आहे. या संपुर्ण प्रकरणाची माहिती नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त तथा निवडणुक अधिकारी, जिल्हा धिकारी नागपुर आणि शिक्षणाधिकारी जि प नागपुर यांना देण्यात आली आहे. शिक्षक भरती तातडीने करावी, निवडणुक काळात पर्यायी व्यवस्था उभारावी आणि शिक्षण बाह्य कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, अशी जोरदार मागणी शिक्षक, पालक व सामा जिक संघटनां कडुन होत आहे. अन्यथा ग्रामिण मराठी शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




