spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अरोली- निमखेडा -मौदा या 128 करोड रुपयाच्या नवीन सिमेंट रस्त्याच्या बांधकामात जुन्या डांबरी रस्त्याच्या साहित्याच्या वापर 

किशोर साहू, मौदा, ता, २१:- अरोली – निमखेडा – मौदा या 128 करोड रुपयाच्या नवीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून, या रस्त्यावर भेंडाळा ते अंजनगाव दरम्यान जुन्या डांबरी रस्त्याच्या साहित्याच्या वापर होत आहे. याबाबत सनराइज कन्स्ट्रक्शन चे अभियंता भानू प्रताप सिंग यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी, जुन्या साहित्याने रस्ता मजबूत होत असल्याने, पीडब्ल्यूडी चे अधिकारीच जुन्या साहित्याच्या वापर करायला सांगितल्याचे त्यांनी सांगितले. सनराइज् कन्स्ट्रक्शन चे उपप्रकल्प व्यवस्थापक अमित पांडे व पीडब्ल्यूडी चे उपअभियंता पचकवडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Popular Articles