Home Latest News जागतिक मराठी परिवार महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

जागतिक मराठी परिवार महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

0

<p><strong>&CenterDot; जगभरातील मराठी समाजाशी नाते दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> जगभरातील मराठी समाज हा महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार असून त्यांचे ज्ञान&comma; अनुभव&comma; जागतिक संपर्क आणि गुंतवणूक राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाची ठरणार आहे&period; त्यामुळे जगभरातील मराठी परिवाराशी अधिक परिणामकारक&comma; सातत्यपूर्ण आणि संस्थात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित &&num;8216&semi;मध्यपूर्व आणि आफ्रिका डायस्पोरा आउटरीच&&num;8217&semi; या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते&period; यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ&period; राजेश गवांदे&comma; विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संयुक्त अरब अमिराती&comma; सौदी अरेबिया&comma; कतार&comma; ओमान&comma; बहरीन&comma; कुवेत&comma; दक्षिण आफ्रिका&comma; केनिया&comma; नायजेरिया&comma; युगांडा आदी देशांतील महाराष्ट्र मंडळांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-54499 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;मध्यपूर्वआणिआफ्रिकाडायस्पोराआउ&period;टनलाईनसंवाद-राजशिष्टाचारमंत्रीजयकुमाररावल1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राजशिष्टाचार विभागाकडे थेट परकीय गुंतवणूक &lpar;एफडीआय&rpar; तसेच डायस्पोरा अफेअर्स अँड आउटरीच या नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत&period; या माध्यमातून जगभरातील महाराष्ट्राच्या परिवाराशी दृढ&comma; सातत्यपूर्ण आणि परिणामकारक संबंध निर्माण करण्याचे काम सुरू असून जागतिक मराठी समाजाला राज्याच्या विकास प्रक्रियेत सक्रिय भागीदार म्हणून जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्राची ताकद केवळ राज्याच्या भौगोलिक सीमांमध्ये नसून जगभर आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीमध्ये असल्याचे सांगून त्यांनी उद्योग&comma; व्यापार&comma; आरोग्य&comma; शिक्षण&comma; तंत्रज्ञान&comma; वित्त&comma; संशोधन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठी बांधवांचे अभिनंदन केले&period; परदेशात राहूनही मराठी भाषा&comma; साहित्य&comma; संस्कृती आणि परंपरा जतन करणाऱ्या महाराष्ट्र मंडळे व सामाजिक संस्थांच्या कार्याचेही राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मध्यपूर्वेतील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील मराठी बांधवांच्या सुरक्षिततेबाबत महाराष्ट्र शासन संवेदनशील असल्याचे सांगून सर्वांनी स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period; संयुक्त अरब अमिरातीतील इंडियन पीपल्स फोरम महा हेल्पलाइनने संकटाच्या काळात १&comma;२०० भारतीय पर्यटकांना सुरक्षितपणे मायदेशी परतण्यास मदत केल्याबद्दल संबंधित संस्था आणि सदस्यांचे मंत्री रावल यांनी विशेष अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आफ्रिका खंडातील काही भागांमध्ये इबोला आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी&comma; असे आवाहनही त्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात उद्योग&comma; पायाभूत सुविधा&comma; कृत्रिम बुद्धिमत्ता&comma; हरित ऊर्जा&comma; लॉजिस्टिक्स&comma; पर्यटन&comma; कृषी&comma; अन्न प्रक्रिया आणि स्टार्टअप्स या क्षेत्रांत वेगाने प्रगती होत असल्याचे सांगून महाराष्ट्राला केवळ आर्थिक गुंतवणूक नव्हे&comma; तर जागतिक मराठी समाजाचे ज्ञान&comma; अनुभव&comma; कौशल्य आणि जागतिक संपर्क जाळेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला &&num;8216&semi;महाएनआरआय कनेक्ट&&num;8217&semi; हा उपक्रम जगभरातील मराठी समाजाला महाराष्ट्र शासनाशी जोडणारे प्रभावी डिजिटल व्यासपीठ ठरणार असून गुंतवणूक&comma; उद्योग&comma; ज्ञानाची देवाणघेवाण&comma; सांस्कृतिक आदानप्रदान आणि शासनाशी थेट संवादासाठी त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहील&comma; असेही त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मागील आठवड्यात अमेरिकेतील मराठी बांधवांशी संवाद साधल्यानंतर आता मध्यपूर्व आणि आफ्रिका खंडातील मराठी समाजाशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी हा संवाद यापुढेही नियमितपणे सुरू राहील&comma; अशी ग्वाही दिली&period; महाराष्ट्र शासनाला जगभरातील मराठी समाजाशी केवळ संपर्क ठेवायचा नसून कायमस्वरूपी&comma; विश्वासाचे आणि विकासाभिमुख नाते निर्माण करायचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमात मध्यपूर्व आणि आफ्रिका खंडातील विविध महाराष्ट्र मंडळांच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव&comma; सूचना आणि अपेक्षा व्यक्त केल्या&period; शासनाशी सातत्यपूर्ण संवाद आणि अधिक समन्वयाची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version